Table of Contents
रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आरोग्याकडे लक्ष देण्यात विसरून जातो पण त्याच ठिकाणी जर तेलामध्ये बदल केला तर आपला बरेच आजार वगैरे कमी होऊ शकता जवळजवळ 80 प्रकाराचे आजार हे कमी गुणवत्तेचं किंवा खराब खाद्यतेल खाल्ल्यामुळे होते. तर आज आपण कोल्ड प्रेस ऑइल तेल म्हणजे काय आणि कोणते खाद्य तेल खाण्यासाठी योग्य आहे तसेच घरच्या घरी हे तेल कसे काढता येते हे पाहणार आहोत.
नमस्कार! मी योगेश, आपल्या ज्ञानामध्ये थोडीशी भर पाडण्यासाठी आणि योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सेवेत. तर चला आपल्या टॉपिक कडे वळूया.,!!
कोल्ड प्रेस ओईल तेल म्हणजे काय?
कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे ज्या तेलाला काढताना त्या तेलाचे तापमान ५० डिग्री सेल्सिअस च्या वरती जात नाही.
कोल्ड प्रेस हा आपण शब्दशः अर्थ घेतो त्यामुळे आपल्याला असे वाटते की हे तेल थंड मध्येच निघते. पण कोणत्याही तेलाला तेलबिया मधून काढण्यासाठी एक निश्चित तापमान आवश्यक असते. त्या तापमानावर आल्यावर तेलबिया तेल सोडायला सुरुवात करतात.
लाकडी तेल घाण्याचे तेल थंड निघत नाही! लाकडी तेलघाणा सविस्तर माहिती:

आता, यात तुम्हाला असे वाटत असेल की जे तेल आपण लाकडी घाण्यातून काढतो तर ते तेल पाणी मारून थंड ह्याच्यामध्ये काढले जाते, पण याचा मागील तांत्रिक गोष्टीकडे कोणी लक्ष देत नाही. लाकडी घाणा तेल मशीन मध्ये लाकडाचा एक लाट असतो जो 17-18 किलोचा असतो आणि त्या लाकडी लाटाला पाच ते सात एचपी ची मोटर फिरवत असते. आणि आपण तेलबिया टाकल्या टाकल्या त्यातनं तेल निघत नाही. आपण लाकडी तेल घाणा मशीन चालू केल्यावर त्याच्यामध्ये तेलबियांचा 15 ते 25 किलो पर्यंत घास टाकतो व जवळ जवळ अर्धा ते पाऊण तास त्या तेलबिया व लाकडी घाण्याच्या प्रेशर मध्ये येऊन घर्षण निर्माण होतो आणि अर्ध्या तासाच्या घर्षणाने त्याच्यामध्ये उष्णता निर्माण होते पण ही उष्णता 40 ते 60 डिग्री च्या दरम्यान असते आणि तेल बियांना त्यांचा मिनिमम टेंपरेचर मिळालं की ते तेल सोडायला सुरुवात करतात.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर लाकडी घालण्यात पाणी का वापरला जातो?

तर लाकडी घाण्यामध्ये अर्ध्या तासापासून तेलबिया घर्षणाने तेल सोडायला चालू करतात पण त्यातीलबियातील संपूर्ण तेल बाहेर निघत नाही लाकडी खाण्याच्या लाकडी लाटा मुळे तेल बिया दबल्या जातात व त्याचा लगदा तयार होतो आता या लगद्यातील राहिलेले तेल काढण्यासाठी त्यावर पाण्याचा मारा करतात. आता त्या लगद्या मधील राहिलेले तेल पण बाहेर यायला चालू होते आणि घर्षण आणि उष्णतेमुळे त्या पाण्याची वाफ होते व थोडेफार पाणी त्या लगद्यामध्ये राहते. या सर्व प्रोसेस मध्ये आपण फक्त पाण्याकडे लक्ष देतो की हे तेल थंड मध्ये काढले जाते असा आपल्याला वाटते. या सर्व गोष्टी बारकाईने लक्षात घेतले तर आपल्याला हे लक्षात येते की कुठल्याही तेलबियांचं तेल गाळप करण्यासाठी त्या तेलबियाला निश्चित किंवा आवश्यक असलेले तापमान हवे असते त्याशिवाय कोणतीही तेल बी ही तेल सोडत नाही. शिवाय दाब दिल्याने जर तेल निघत असते तर आपल्या महाराष्ट्रीयन गृहिणींनी कोळपाटावर दाबून तेल काढले असते किंवा मग खलबत्त्यात कुठून काढले असते. आता याच्यात असं आहे की आपण लाकडी तेल घाणा तेल खाल्लं पाहिजे की नाही. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे तेल खा हे तुम्ही स्वतःच्या घरगुती तेल घाण्यातून काढा किंवा मग बाजारातील लाकडी तेल घाणा वरून काढून आणा पण ते डोळ्यासमोरच गाळप केलेलं असलं पाहिजे, ज्यामुळे तुम्ही 100% त्याबाबत खात्रीशील राहाल.
कोणते खाद्यतेल खाण्यासाठी योग्य आहे? कोणते कोल्ड प्रेस ऑइल तेल खाण्यासाठी योग्य आहे?
आता कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आले, पण कोणते तेल शरीरासाठी चांगले आहे हाही एक महत्त्वाचा भाग आहे. आपण विविध प्रकारचे तेल जेवणामध्ये समावेश केला पाहिजे आणि आदलून बदलून तेल खायला पाहिजे. त्यात तीळ मोहरी जवस सूर्यफूल शेंगदाणा करडई हे असणे आवश्यक आहे. कारण जे पोषक तत्व आपल्याला जेवणामधून पाहिजे असतात ते एका तेलामध्ये नसते आणि दर हप्त्याला किंवा दर महिन्याला बदललेल्या तेलामुळे आपल्याला आवश्यक ते पोषक तत्व मिळतात व आपला आरोग्य आणि शरीर निरोगी सुदृढ आणि रोगप्रतिकारक बनते. त्याशिवाय जर लहान मुलं घरात असतील तर बदामाचे अक्रोडचे तेल काढून त्या तेलाचा उपमा शिरा किंवा इतर खाद्यपदार्थ त्यांना बनवून दिल्यास लहान मुलांच्या मेंदू ना आवश्यक असलेले पोषक तत्व मिळता व त्यामुळे त्यांना भरपूर फायदा होतो जेवढा फायदा दीड दोन लाखांचे क्लासेस लावून होत नाही त्याच्यापेक्षा कित्येक पटीने त्यांना शुद्ध तेल आणि कोल्ड प्रेस कॅटेगरीतलं तेल रोजच्या आहारात समावेश केल्याने मिळेल.
आता हे कोल्ड प्रेस ऑइल तेल आपण घरच्या घरी काढायचे कसे?

बाजारामध्ये विविध प्रकारचे घरगुती तेल घाणे मिळतात तुम्ही ऑनलाईन परचेस करायला गेले तर विविध चायनीज बेस कंपनीचे तुम्हाला तेल घाणी मिळतील. पण आपण भारतीय आहोत आणि मेड इन इंडिया असलेले वस्तू वापरण्याला प्राधान्य द्या.
सर्वात महत्त्वाचं घरगुती तेल घाणा घेताना ते फूड ग्रेड मटेरियल चे आहे का हे पडताळणे आवश्यक आहे.
Millson Oil Extraction Machine For Domastic use with Foodgraid Material 304 & 316 Stainless steel-click here for More information- Click Here
फूड ग्रेड मटरेल म्हणजे काय? कोल्ड प्रेस ओईल तेलघाणा फूड ग्रेड मटेरियलचा का असावा?
तर हे आपण एका छोट्याशा उदाहरणाने समजूया बाजारामध्ये विविध प्रकारच्या कात्र्या मिळतात त्याच्यात सहजासहजी घरात वापरण्यासाठी साधी कात्री येते की 50 ते 100 रुपयाला मिळते, त्यानंतर टेलरची कात्री येते की 200 ते 250 रुपये पर्यंत मिळते आणि डॉक्टरांकडे ऑपरेशन थेटर मध्ये युज केला जाणाऱ्या कात्रळयेतात त्या 20 ते 25 हजाराला मिळतात. तिन्ही ठिकाणी कात्र्या कापायचं काम करतात, पण विविध ठिकाणी त्या कात्र्याच्या मटेरियल मध्ये फरक आहे. घरगुती कात्री ही साधी असते टेलरची कात्री ही पितळाची किंवा तांब्याची असते. आणि डॉक्टरची सर्जिकल कात्री ही फूड ग्रेड मटरेल म्हणजेच उच्च ग्रेडच्या स्टेनलेस स्टील पासून बनलेली असते. यामुळे डॉक्टरांच्या कात्रीमुळे रुग्णाचे उपचार केल्यावर फंगस किंवा इतर कोणताही धोका रुग्णांना होत नाही. म्हणून तेलाचा संबंध आपल्या पोटाशी येतो त्या ठिकाणी देखील आपण फूड ग्रेड मटरेल असलेल्या तेल काढणाऱ्या मशीन चा वापर केला पाहिजे.
हॉट प्रेस ओईल मशीन आणि कोल्ड प्रेस ऑइल मशीन:
आता घरगुती तेल घाणा मशीन या हॉट प्रेस असतात आता याचा अर्थ कसा याच्यामध्ये तेलबिया फ्रेश होतात आणि तेल गाळप करतात व उरलेला तेलबियांचा चोथा हा गरम करून त्या प्रेसिंग ट्यूब मधून बाहेर काढला जातो. तर याच्यासाठी 150°C, 200°C ते 250°C इतके असू शकते. आता याच्यात करताना तेलाचे तापमान हे 50 डिग्री च्या वरती जात नाही बऱ्याच लोकांना हा गैरसमज आहे, की हॉट प्रेस मशीनमध्ये जे तापमान दाखवले जाते त्यास तापमानावर तेल गाळप होते. पण हॉट प्रेस मशीन असून सुद्धा या मशीन मधून कोल्ड प्रेस ओईल तेल काढले जाते.
या सर्व गोष्टी बारकाईने लक्षात घेतले तर आपल्याला हे लक्षात येते की कुठल्याही तेलबियांचं तेल गाळप करण्यासाठी त्या तेलबियाला निश्चित किंवा आवश्यक असलेले तापमान हवे असते त्याशिवाय कोणतीही तेल बी ही तेल सोडत नाही. शिवाय दाब दिल्याने जर तेल निघत असते तर आपल्या महाराष्ट्रीयन गृहिणींनी कोळपाटावर दाबून तेल काढले असते किंवा मग खलबत्त्यात कुठून काढले असते. आता याच्यात असं आहे की आपण लाकडी तेल घाणा तेल खाल्लं पाहिजे की नाही. तर तुम्ही कोणत्याही प्रकारचे तेल खा हे तुम्ही स्वतःच्या घरगुती तेल घाण्यातून काढा किंवा मग बाजारातील लाकडी तेल घाणा वरून काढून आणा पण ते डोळ्यासमोरच गाळप केलेलं असलं पाहिजे, ज्यामुळे तुम्ही 100% त्याबाबत खात्रीशील राहाल.
लाकडी तेलघाणा किंवा घरगुती तेलघाणा मशीन | लाकडी तेलघाणा आणि कोल्ड प्रेस ऑइल मशीन:
लाकडी तेल घाण्याचे काही गोष्टी आहेत त्यामुळे आपण घरगुती तेल घाण्यास जास्त प्राधान्य द्यावे:
- लाकडी तेलघाणा यात मोठ्या आवश्यक तेवढा घास द्यावाच लागतो दहा ते पंधरा किलो किंवा वीस किलो, पण घरगुती तेल गाण्यांमध्ये तुम्ही 50 ग्रॅम पासून ते दहा किलो पर्यंत गाळप करू शकता
- लाकडी तेल घाणा मध्ये एकाच प्रकारच्या तेलाचे तेल काढता येते, त्या ठिकाणी जर घरगुती तेल काढण्याची मशीन असेल तर विविध प्रकारच्या बिया तुम्ही यातून गाळप करू शकता उदाहरणार्थ बदामाचे जवसाचे अक्रोडचे तेल तुम्ही घरगुतीघाण्यातून काढू शकता.
- लाकडी तेल घाणातील तेल हे तुमच्या डोळ्यासमोर काढलेले पाहिजे बऱ्याचदा भेसळयुक्त पाम तेलही त्यात मिक्स केले जाऊ शकते. त्या ठिकाणी घरगुती तेल घाणा मशीन मध्ये आपण डोळ्यासमोरच तेल काढणारे जे तुम्ही टाकणार त्याचे स्थिर निघणार त्यामुळे भेसळ कारणच येत नाही
- लाकडी तेल घाण्यावर हायजिन मेंटेन केलेली नसते, त्याच ठिकाणी घरगुती तेलघाण्याची काळजी आपणच घेणार आहोत त्यामुळे हायजिन आपण मेंटेन ठेवू शकतो.
यावरून तुम्हाला कोल्ड प्रेस ऑइल कसे असते त्याच्या मागील नेमकी प्रोसेसिंग प्रक्रिया आपल्याला समजले आणि कोणते तेल खायला पाहिजे जे की आरोग्यासाठी आवश्यक आहे तेही या आर्टिकल मधून आपल्याला कळाले. तुम्हाला जर हा आर्टिकल आवडला असेल आणि अशाच विविध गोष्टींचे बारकाईने माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि या आर्टिकल ला होईल तेवढं शेअर करा जेणेकरून बऱ्याच लोकांचा गैरसमजही दूर होईल.
Also Read : Vaibhav Suryavanshi Lifestyle, Networth, Family
कोल्ड प्रेस तेल (ऑइल) कसे ओळखावे?
कोल्ड प्रेस तेल (ऑइल) ओळखण्यासाठी ते पारदर्शक, जाडसर आणि त्याचा वास नैसर्गिक असतो. त्यात कोणतेही रसायनांचा वास किंवा चकाकी नसते. शुद्ध कोल्ड प्रेस तेल बऱ्याचदा थोडे गडद रंगाचे आणि जास्त चिकट असते. तसेच ते लवकर खराब होत नाही परंतु थंड ठिकाणी साठवावे लागते.
कोल्ड प्रेस तेल (ऑइल) कोणत्या तापमानावर काढले जाते?
कोल्ड प्रेस तेल (ऑइल) साधारणतः 40°C ते 50°C तापमानाच्या दरम्यान काढले जाते. या तापमानामुळे बिया आपले पोषक तत्त्व गमावत नाहीत आणि तेल नैसर्गिक राहते.
कोल्ड प्रेस तेल आणि हॉट प्रेस तेल यामध्ये फरक काय?
हॉट प्रेस तेल 150°C ते 250°C तापमानावर काढले जाते, ज्यामुळे त्यातील पोषक घटक नष्ट होतात. कोल्ड प्रेस तेल नैसर्गिक पद्धतीने कमी तापमानावर काढले जाते, त्यामुळे त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन्स टिकून राहतात.
keywords:
Cold Pressed Oil in Marathi
Health Benefits of Cold Press Oil
Wooden Oil Ghani Explained
Home Oil Extraction Machine
Food Grade Oil Press
Cold Pressed Oil Process in Marathi
Ayurvedic Oil Benefits
Marathi Health Tips
Natural Cooking Oil
Best Oil for Kids Brain Development
ColdPressedOil #HealthyOil #WoodenGhaniOil #ColdPressMachine #NaturalLiving #HealthyCooking #FoodGradeMachine #AyurvedicOil #DesiHealthTips #OrganicOilMatters